जिल्हा परिषद हायस्कृल उत्तमसरा येथे शालेय स्नेहसंम्मेलनाचे आयोजन
विविध स्पर्धेचे आयोजन
अमरावती/भातकुली दि.२३- इंद्रधनुष्य स्नेहसंमेलन 2025 दिनांक 21 जानेवारी 2025 ते 23 जानेवारी 2025 ला जिल्हा परिषद हायस्कृल उत्तमसरा पं.स.भातकुली येथे संपन्न होत आहे. मैदानी खेळ, पाककला स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,हस्तकला स्पर्धा,पुष्पगुच्छ स्पर्धा, प्रश्नमंजुषा, आनंद मेळावा इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या तीन दिवशीय कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच धर्मेंद्र मेहरे, कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रविण शेवतकर, उपसरपंच संगीता ताई मानकर, ग्रामपंचायत सदस्य शेवतकर ताई,डॉ. सोनाली देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य, गावातील सन्माननीय सदस्य, शाळेची सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटन सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय थाटामध्ये पार पडला. शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला.
जि.प. माध्यमिक शाळा उत्तमसरा येथील शाळेचे मुख्याध्यापक लोमेश खैरकर, संतोष कुर्हेकर,चंद्रशेखर ब्राह्मणकर,उमेश बसरे, शितल भोपाळे, अश्विनी झाडे, ज्योत्स्ना हायगले, प्रतिभा नांदने, कुमारी प्राजक्ता भडके, भूषण बुरंगे,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी इंगळे,स.शि.गजानन येलोने, सुनिता अकर्ते,प्रमोद कांबळे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.