निपुण अंतर्गत माता पालक सभेचे आयोजन
जिल्हा समन्वयक मनिष ठाकरे यांची जि.प.प्राथमिक शाळा उत्तमसरा येथे भेट
भातकुली दि.२७-पंचायत समिती भातकुली मधिल दि. २४/१/२०२५ रोजी जि. प. प्रा. शाळा उत्तमसरा येथे निपूण अंतर्गत माता - पालकांची सभा घेण्यात आली.
या सभे मध्ये आयडीया विडिओ, वर्कशिट कशी भरतात याबद्दल ची चर्चा करण्यात आली सभेकरिता प्रथम संस्थेचे जिल्हा समन्वयक मनिष ठाकरे यांनी भेट दिली असता माता पालक गटांची प्रतिक्रीया जानुन घेतली तसेच विद्यार्थ्यांमध्ये लक्षनिय बदल पालकांनी दिसुन आला. आयडिया विडीओ चा वापर केल्यामूहे मुलांकडून अभ्यास कसा करून घ्यावा याबद्दलचे मार्गदर्शन मनिष ठाकरे यांनी केले. कार्यक्रमामध्ये विविध खेळाचा आनंद घेऊन माता-पालकांन मध्ये मोठा उत्साह पाहावायसा मिळाला मुख्य वर्ग १ते३ च्या विद्यार्थ्यांकरिता असणारा हा निपून चा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी इंगळे मॅडम यांनी प्रास्ताविक केले व सूत्र संचालन गजानन येलोने यांनी केले आभार सुनिता अकर्ते व प्रमोद कांबळे यांनी मानले, स्मार्ट माता वनिता जोगी,प्रिया मानकर, सविता जुनघरे, अश्विनी पवार,स्वेता मेहरे यांच्यासह माता पालक संघाच्या महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निपुण हा शिक्षण मंत्रालयाचे एक उपक्रम आहे. या अभियानाचा उद्देश, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्ये विकसित करणे हा आहे. या अभियानाला 'नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्युमरसी' (NIPUN) असेही म्हणतात.
निपुण भारत अभियानाची वैशिष्ट्ये:
या अभियानाचा उद्देश, 2025 पर्यंत प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्ये विकसित करणे हा आहे.
या अभियानात खेळ, कथा, ताल, स्थानिक कला, हस्तकला आणि संगीत यांसारख्या क्रियाकलापांचा समावेश आहे.
या अभियानामुळे मुलांना आनंदाने शिकता येते आणि आजीवन शिक्षणासाठी भक्कम पाया तयार होतो.
या अभियानात 5+3+3+4 या रचनेचे शिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.