MENU
  • Total Visitor ( 136359 )

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यासोबत वाल्मिक कराड यांचा फोटो

Raju tapal December 31, 2024 56

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यासोबत वाल्मिक कराड यांचा फोटो,
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले.

मुंबई;-बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येप्रकरणात सर्व आरोपींना अजून अटक झाली नाही. या हत्या प्रकरणात मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचे म्हटले जात आहे.परंतु गेल्या २२ दिवसांपासून वाल्मिक कराड पोलिसांना मिळत नाही. वाल्मिक करडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोप केला जात आहे.

आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. राऊत यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर एक पोस्ट ट्विट केली आहे. त्यात वाल्मिक कराडसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री असणारा फोटो आहे. तो फोटो पोस्ट करुन संजय राऊत यांनी व्वा! क्या सीन है? नक्की कोण कुणाचा आका?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांनी काय म्हटले?

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत वाल्मिक कराड याचा असलेला फोटो ट्विट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासोबत फोटोत असणारा खंडणीखोर, खुनी, गावगुंड (वाल्मिक कराड) पोलिसांना सापडत नाही. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल. हाय का नाही मोठा जोक? असे राऊत यांनी म्हटले आहे. या फोटोला त्यांनी क्या सीन है? नक्की कोण कुणाचा आका? असे कॅप्शन दिले आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement