पी एम पी - दुचाकीची समोरासमोर धडक; तिघांचा मृत्यू
मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- पी एम पी - दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे रस्त्यावर त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयासमोर शुक्रवार दि.९ में २०२५ रोजी घडली.
प्रथमेश नंदकुमार शेलार वय -१८, हर्षल दिगंबर घुमे वय -१९ दोघेही रा.तळेगाव ढमढेरे ता.शिरूर,आयुष अतुल जाधव वय - १६ रा.मावळ जि.पुणे अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघा युवकांचे,एका अल्पवयीन मुलाचे नाव आहे.
या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तिघे युवक मित्र शिक्रापूर - तळेगाव ढमढेरे रस्त्याने दुचाकीवरून चाललेले असताना त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयासमोर समोरील वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोरून आलेल्या पी एम पी क्रमांक एम एच १२ एक्स एम ८८२१ बसला युवकांची दुचाकी क्रमांक एम एच १२ एक्स जी ४७९६ धडकल्याने हा अपघात झाल्याचे समजले.
अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे)