पोलीस वाहनाच्या अपघातात जखमी झालेल्या उदगीर शहर पोलीस हवालदाराचा मृत्यू
Raju Tapal
December 01, 2021
34
पोलीस वाहनाच्या अपघातात जखमी झालेल्या उदगीर शहर पोलीस हवालदाराचा मृत्यू
उदगीर येथील विविध गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल तपासणीसाठी न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा नांदेड येथे जमा करून परत येताना तिरूका ता.जळकोट येथे पोलीस वाहनाच्या अपघातातात जखमी झालेल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यातील कार्यरत हवालदार मच्छिंद्रनाथ वामनराव वर्टी वय - ४६ यांचा मंगळवारी दि.३० नोव्हेबरला पुढील उपचारासाठी लातूरला घेवून जाताना मृत्यू झाला.
उदगीर शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या विविध गुन्ह्यातील मुद्देमाल नांदेड येथील न्यायवैज्ञानिक प्रयोग शाळेत सी.ए.तपासणी जमा करण्यासाठी पोलीस ठाण्यातील शासकीय वाहन एम एच २४ ए डब्ल्यू ९३४९ घेवून पोलीस हवालदार मच्छिंद्रनाथ वर्टी, पोलीस कर्मचारी गोपाळ भालेराव सोमवारी दि.२९ नोव्हेबरला नांदेडला गेले होते.
सायंकाळी मुद्देमाल जमा करून परत येते वेळेस जळकोट - उदगीर महामार्गावरील तिरूका येथे वळण रस्त्याजवळ समोरून येणा-या वाहनाची लाईट पडल्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी पलटी होवून अपघात झाला. दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना उदगीरच्या उदयगिरी खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले हवालदार मच्छिंद्रनाथ वर्टी यांच्या मानेचा मणका मोडल्यामुळे लातूरला उपचारासाठी घेवून जाताना वाटेतच मृत्यू झाला.
Share This