• Total Visitor ( 84399 )

प्रधानमंञी आवास योजनेचा तालुक्यात सावळा गोंधळ

Raju Tapal December 05, 2021 38

प्रधानमंञी आवास योजनेचा  तालुक्यात सावळा गोंधळ * ' ड ' यादितील नावे गायब झाल्याने खरे लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता !     

  प्रधानमंञी आवास योजनेद्वारे एकही गरजू लाभार्थी वंचित राहू नये सर्वाना निवारा मिळावा या उद्दात हेतूने देशाचे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी हा उपक्रम भारतभर राबविण्याचा संकल्प केला आहे परंतु मुरबाड तालुक्यात   केंन्द्र शासन पुरस्कृत ' प्रधानमंञी आवास योजना ग्रामिण प्रपञ'  ड' मधिल असणारी लाभार्थ्यांची नावे आॕनलाईन यादितून अचानक गायब झाल्याने खरे लाभार्थी वंचित राहणार असल्याचे दिसत असून संपूर्ण तालुक्यात असा प्रकार समोर आला आहे. २०१८ मधे झालेल्या सर्वेक्षणात १६६२३ इतकी नावे  ड  यादित समाविष्ट होती माञ यातिल ५२४१ नावे मागिल महिन्यात झालेल्या पडताळणीत दिसून येत नाही म्हणजेच ही नावे गायब झाली असून सध्या ती आॕनलाईन पोर्टलवर दिसत नाही मग अचानक ही नावे गायब झाली कशी याची चौकशी पंचायत समिती मुरबाड येथे केली असता ति सिस्टीम मधून बाद झाल्याचे सांगितले परंतु आताच्या झालेल्या पडताळणी यादित धनधांडगे , श्रींमत  जमिनदार ,  पेंशनधारकांची नावे माञ राहिली असून या घरकुलांचा लाभ गरजूंना मिळण्याऐवजी धनधांडग्यांना मिळणार असल्याचे वास्तव समोर येत आहे. संपूर्ण तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत मधे हा प्रकार समोर आल्याने खरे लाभार्थी माञ वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.                               * ड यादितील काही नावे गायब झाली असली तरी ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा घेऊन पून्हा नव्याने यादी बनविण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांचीही नावे समाविष्ट केली जातील. "                      दिपक पवार , सभापती पंचायत समिती मुरबाड                                            "मी गेली अनेक वर्ष घरकुल मिळावे म्हणुन ग्रामपंचायत , पंचायत समिती मधे हेलपाटे मारत आहे परंतु आताही ड यादितील नाव गायब झाल्याने घर मिळणे कठिण झाले असून या विरोधात मि उपोषणास बसणार आहे. "                                 सुधाकर शेळके ,लाभार्थी डोंगरन्हावे.                                                                 **  ड  यादितील  वंचित लाभार्थी संदर्भात पून्हा सर्वेक्षण केला जाऊन पुरवणी यादी करुन ती केंन्द्राकडे  पाठविण्यात येईल तसेच यासंदर्भात  केंन्द्रीय मंञी कपिलजी पाटिल यांच्याशी बोलणे झाले असून घरकुला पासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल . भाऊसाहेब दांगडे , मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. ठाणे.

Share This

titwala-news

Advertisement