• Total Visitor ( 84153 )

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण वर्ग शिवाजीनगर ,पुणे येथील उपविभागीय कृषीअधिकारी यांच्या सभागृहात संपन्न

Raju tapal October 01, 2021 33

महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालुका कृषि अधिकारी हवेली  यांच्या वतीने मंडळ कृषि अधिकारी हडपसर यांच्या मार्फत तसेच मा.श्री.ज्ञानेश्वर बोटे  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे  व मा.श्री सुनिल खैरनार, उपविभागीय कृषि अधिकारी, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण वर्ग दिनांक २९/०९/२०२१ रोजी दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत शिवाजीनगर ,पुणे येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या सभागृहात   संपन्न झाला.     सदर प्रशिक्षण वर्गात शेतकरी, शेतकरी बचत गट , महिला बचत गट व छोटे उद्योजक यांनी सहभाग नोंदवला.  तसेच त्यांना कृषि प्रक्रिया संबंधीत कृषि विभागाच्या योजनांची माहिती , उत्पादित कृषि मालाचे मुल्यवर्धन  बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 

मा.श्री तेजोमय घाडगे , जिल्हा रिसोर्स परसन (डीआरपी) यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनांबाबत लाभार्थी निवड, लाभार्थीची पात्रता, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, बॅंक प्रोजेक्ट रिपोर्ट,बॅंक कर्ज, अनुदान बाबत मार्गदर्शन करताना सर्व उद्योजक यांनी महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या ३५ टक्के अनुदानाचा लाभ घेणे बाबत मार्गदर्शन केले.संबंधीत उद्योजकांनी सध्या चालु असलेल्या उद्योगांचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण,ब्रॅडिंग , मार्केटींग , करुन मुल्यवर्धन करुन जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच ओडीपी योजना अंतर्गत टोमॅटो प्रक्रिया उद्योगांची नवीन उभारणी करुन शासनाच्या अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित उद्योजकांना केले.

मा‌.श्री सत्यवान नर्हे ,तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी,पुणे यांनी कृषि प्रक्रिया संबंधीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग,स्मार्ट प्रकल्प,मॅग्नेट प्रकल्प ,विकेल ते पिकेल योजना ,कृषि निर्यात योजनांचे निकष व शासकीय अनुदान बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

मा.श्री मारुती साळे, तालुका कृषि अधिकारी, हवेली यांनी एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) अंतर्गत टोमॅटो प्रक्रिया उद्योग तसेच नाॅन ओडीपी योजना अंतर्गत इतर कृषि प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उत्पादित कृषि मालांचे (उदा.फळे, भाजीपाला,मसाला पिके , दुग्धजन्य पदार्थ, तृणधान्ये , कडधान्य, तेलबिया) मुल्यवर्धन बाबत सविस्तर मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी बचत गट,महिला बचत गट व छोटे उद्योजक यांनी शासनाच्या अनुदानित योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

 

मा.श्री.गुलाब कडलग, मंडळ कृषि अधिकारी हडपसर यांनी कृषि मालाचे उत्पादन, उत्पादकता  व मुल्यवर्धन बाबत मार्गदर्शन करताना मंडळ कृषि अधिकारी हडपसर यांच्या कार्यक्षेत्रातील विविध गावात  कार्यरत असलेले छोटे उद्योजक शेतकरी, शेतकरी बचत गट, महिला बचत गट व युवा उद्योजक यांनी शेतमालावर प्रक्रिया करून मालाचे मुल्यवर्ध‌‌‌ करावे व निव्वळ नफा जास्तीत जास्त मिळविण्यासाठी प्रयत्न करणेचे आवाहन केले

  श्री‌.मेघराज वाळुंजकर कृषि पर्यवेक्षक हडपसर-१ यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण वर्गात फळे व भाजीपाला पिकांबरोबरच तृणधान्ये व कडधान्ये पिकांच्या उत्पादित कृषि मालावरील  प्रक्रिया,उप उत्पादने , बाजारपेठेतील गरजे नुसार उत्पादन व विक्री बाबत मार्गदर्शन केले तसेच सदर प्रशिक्षण वर्गास उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी, विविध उद्योजक , शेतकरी, महिला बचत गट यांचे आभार मानले .

   श्री.रामदास डावखर,कृषि पर्यवेक्षक हडपसर-२ यांनी जास्तीत जास्त उद्योजक शेतकरी यांना सहभागी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

सदर प्रशिक्षण वर्गात विविध गावामधुन शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात संबंधीत गावाचे  कृषि सहाय्यक श्री महेश सुरडकर,श्रीमती ज्योती हिरवे,श्रीमती मुक्ता गर्जे,श्री.नागेश म्हेत्रे,श्री महेश महाडीक,श्री.अमित साळुंके,श्री.शंकर चव्हाण,श्री.राजेंद्र भोसेकर यांनी मोलाचे योगदान दिले.

    प्रशिक्षिणार्थी श्री दिगंबर ताटे,श्री.नितीन कामठे,श्री.दिपक कामत,श्री.नरेश नहार, श्री.नितीन आंबेकर,श्री.बुधानी ब्रदर्स,श्री. चैतन्य कोकाटे व इतर शेतकरी महिला उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share This

titwala-news

Advertisement