प्रहार शेतकरी संघटनेचे जातेगाव येथे ठिय्या आंदोलन सुरूच
प्रशासकीय अधिकार्यांचे दुर्लक्ष
नांदगाव तालुक्यातील ढेकू ते बोलठाण रस्ता हा अत्यंत दयनीय झाला असून जातेगाव येथील खरोळा नदीवरील पूल ढासाळलेला असल्याने येथे अगोदर दोन जणांचा जीव गेला असून देखील या पुलाचे काम करण्यात आले नसल्याने व सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगाव यांना निवेदन देऊन देखील दखल न घेतल्याने दिनांक 10 डिसेंबर 2021 शुक्रवार पासून जातेगाव येथील खरोळा नदीवरील पुलाजवळ प्रहार शेतकरी संघटनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सूर्यवंशी व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून अधिकाऱ्यांचे अद्याप लक्ष नाही.
शेतकरी प्रहार संघटनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सूर्यवंशी आणि चंद्रभान झोडगे, जनार्दन भागवत, ईश्वर जाधव, रवी भागवत, प्रकाश चव्हाण, श्रीराम जाधव,
ममराज भडाळे, महेश पवार, नामदेव वाघ, रोहित माळी आदींनी आंदोलन सुरू केले असून बोलठाण आऊट पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगुर्डे, प्रदीप बागुल या आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते.