मेळघाट मधिल कंञाटी शिक्षकांचे मासिक वेतन दिवाळी पूर्वी दया
प्राथमिक शिक्षक समितीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन
अमरावती दि.२१- पेसा अंतर्गत पं.स. चिखलदरा व धारणी मधील शाळांवर नियुक्त कंत्राटी शिक्षकांचे वेतन दिवाळी पुर्वी करण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अजय पवार व जिल्हा सरचिटणीस शैलेन्द्र दहातोंडे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प.अमरावती यांना आज दिले.
माहे सप्टेंबर या महिण्यामध्ये जि.प. अमरावती अंतर्गत पं.स.धारणी व पं.स. चिखलदरा मधील शाळांमध्ये १२० ते १३० कंत्राटी शिक्षकांची नेमणुक प्रत्येक शाळेवर करण्यात आली आहे.या शिक्षकांनी संघटने कडे केलेल्या मागणीनुसार यांचे वेतन अजुन झालेले नाही. त्यामुळे आपणास विनंती की, शिक्षकांचे माहे सप्टेंबर व माहे ऑक्टोंबर २०२४ चे वेतन दिवाळी पुर्वी करण्यात यावे.दिवाळी हा महत्वाचा सण आहे तरी दोन्ही महीण्याचे वेतन देण्यात यावे अशी मागणी शिक्षक समितीने केली आहे.