प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक राज्य अधिवेशन वेंगुर्लेत
अमरावती :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे महाअधिवेशन १५ व १६ फेब्रुवारीला वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली. अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष शिक्षणमंत्री दीपक केसरकर असून राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
राज्यातील प्राथमिक शिक्षक व त्यांच्या समस्या, शासनाचे नवीन शाळा -
धोरण याबाबत अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे. यासाठी शिक्षण परिषद आयोजित केली असून तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार असून राज्य व राष्ट्रपती पुरस्कार मिळविणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, शिक्षण सेवक मानधन वाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, या अधिवेशनात शिक्षकांना मुख्यालय सक्ती रद्द करावी. व मुख्यालयाच्या नावाखाली घरभाडे भत्ता बंद करण्याचा प्रकार थांबवावा, शिक्षक बदली धोरणात आवश्यकते बदल करावेत. पोषण आहार स्वयंपाकी मानधन वाढवावे. यासह इतर अनेक मागण्या प्रामुख्याने मांडल्या जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याची निवड करून त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे.
यावेळी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सेवाविषयक प्रलंबित मागण्यांबाबत आवाज उठवला जाणार आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी जिल्ह्यातून हजारो शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य महीला प्रतिनिधी प्रविणा कोल्हे, जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत , सरचिटणीस संभाजी रेवाळे,प्रशांत निमकर,लक्ष्मीकांत देशमुख,गजानन दातिर,मनिष येवले,गोविंद मुंडे,दत्ताञय राहटे,महीला आघाडी प्रमुख सरीता काठोळे,सुषमा वानखडे,भावणा ठाकरे.अजय पवार,तुळशिदास धांडे,प्रफुल्ल शेंडे,उमेश चुनकीकर,संगिता तडस,शैलेन्द्र दहातोंडे,छगन चौधरी,संजय शेलोकर,योगीराज मोहोड,नितिन अविनाशे,सुनिल बोकाडे,राजेश ठाकरे,जगदीश वानखडे,रत्नाकर पडोळे,रामदास भाग्यवंत,विनोद पाल,प्रफुल्ल वाठ,गजानन कावलकर,चंद्रकांत कुरळकर,शामकांत तडस,कीशोर वैराळे,विलास चौखंडे,प्रमोद ढाकुलकर,विजय सरोदे,विक्रांत टेकाडे,राहुल वानखडे,रायबोले यांनी केले आहे.