• Total Visitor ( 369709 )
News photo

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रयागराज महाकुंभमध्ये अमृतस्नान

Raju tapal February 07, 2025 55

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रयागराज महाकुंभमध्ये अमृतस्नान;

गंगेचंही केलं पूजन 



प्रयागराज :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराजमधील महाकुंभमध्ये अमृतस्नान केलं. त्यांनी संगमावर डुबकी मारली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्यासोबत होते. अमृतस्नानानंतर त्यांनी गंगेला दूध अर्पण केलं आणि पूजा केली. 



पंतप्रधान मोदी मोटर बोटीने योगींसह संगमावर पोहोचले. यावेळी त्यांनी भगव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. याशिवाय गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली होती. मंत्रोच्चारणादरम्यान मोदींनी एकट्यानेच संगमावर डुबकी लावली. 54 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाकुंभमधील हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी ते 13 डिसेंबरला महाकुंभमध्ये आले होते. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पंतप्रधान मोदी बमरौली एअरपोर्टमधून हेलिकॉप्टरने अरैलला पोहोचले. येथून बोटीने ते महाकुंभ मेळाव्याच्या ठिकाणी आहे. पंतप्रधान मोदींची उपस्थिती असल्याने महाकुंभमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संगमावर पॅरामिलेट्री फोर्सदेखील तैनात करण्यात आली आहे.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement