उदया अमरावती जिल्हा परिषद मधिल विविध पदाकरीता शिक्षकांना पदोन्नतीचे समुपदेशन
शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,पाञ मुख्याध्यापक आणि माध्यमिक शाळेतील विषय शिक्षका करीता पाञ यादी प्रसिध्द
अमरावती :- अमरावती जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागात अनेक पदे रीक्त आहे. ही पदोन्नतीने भरण्याची मागणी शिक्षक संघटना यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.याचा मुहर्त निघाले असुन उदया दि.३ एप्रिला शिक्षका मधुन शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,पाञ मुख्याध्यापक,माध्यमिक शाळेतील वर्ग ९ व १० करीता मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना पदोन्नती करीता डाॅ.पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद अमरावती येथे समुपदेशन व्दारे पदोन्नती करण्यात येणार आहे.या समुपदेशन वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापाञ,अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया देशमुख,समाज कल्याण अधिकारी डी.एम.पुंड,उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस,प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ.अरविंद मोहरे यांच्या उपस्थितीत शिक्षकांना पदोन्नती मिळणार आहे.याकरीता वेळापञक तयार करण्यात आले आहे.आज दुपार पर्यंत १४ ही गटशिक्षणाधिकारी यांनी रीक्त पदाचा अहवाल सादर करावा असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. अरविंद मोहरे यांनी दिले आहे.
या पदोन्नती करीता विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग २ व ३ श्रेणी करीता पदोन्नती ७५पाञ शिक्षकांची यादी
प्रसिध्द करण्यात आली असुन या करीता सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे.केंद्र प्रमुख रीक्त पदाकरीता पदविधर,विषय शिक्षक,पाञ मुख्याध्यापक यांची ९३ शिक्षक व ३ दिव्यांग शिक्षक याची पाञ यादी यांनी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे.पाञ मुख्याध्यापक मराठी माध्यमा करीता ५७० शिक्षक व १४ दिव्यांग शिक्षक यांची यादी प्रसिध्द करण्यात आली असुन तसेच उर्दू माध्यमा करीता १२० व दिव्यांग ५शिक्षकांची पाञ यादी प्रसिध्द करण्यात आली आहे या शिक्षकांनी दुपारी २ वाजता मराठी व दुपारी १२ वाजता उर्दू माध्यमांच्या शिक्षकांनी उपस्थित राहायचे आहे.तसेच जि.प.माध्यमिक शाळेतील इयत्ता ९वी व १० वी उच्च श्रेणी शिक्षक मराठी माध्यमाचे विषया नुसार १८३ पाञ शिक्षकांची यादी तसेच उर्दू माध्यमाच्या शाळेकरीता ३८ प्रतिक्षाधीन सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आली असुन या शिक्षकांनी दुपारी ४ वाजता उपस्थित राहण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी,गटशिक्षणाधिकारी यांनी दिले आहे.
उदयाला होणार्या समुपदेशाना व्दारे जिल्हातील सर्व रीक्त पदे १०० टक्के भरली गेली पाहीजे. या नंतर सहाय्यक शिक्षकांची रीक्त पदे भरण्याची कार्यवाही शिक्षण विभागाने करावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटना यांनी केली आहे.