पं.स.भातकुली ची शाळा शुभारंभ पूर्वतयारी सभा संपन्न.
पं.स.मधिल केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांची उपस्थिती
अमरावती :- आज दि.२० जून २०२५ रोज शुक्रवार ला पं.स.भातकुली अंतर्गत सर्व माध्यमाच्या केंद्र भातकुली, गणोरी,आसरा,आष्टी,टाकरखेडा,पूर्णा नगर,खोलापूर,खारतळेगाव,वाठोडा शुकलेश्वर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक यांच्या शाळा पूर्व तयारी व शाळा शुभारंभ सभेचे आयोजन दोन टप्प्यामध्ये जि.प.कन्या शाळा,अमरावती येथे सकाळी ठीक ११:०० करण्यात आले होते.
या सभेला रामेश्वरजी माळवे (गटशिक्षणाधिकारी,पं.स.भातकुली),मा.शकील अहमद खान सर (शिक्षण विस्तार अधिकारी),मा.पंजाबराव पवार (शिक्षण विस्तार अधिकारी),मा.जानरावजी सुलताने (केंद्रप्रमुख आष्टी),मा.मिलिंद रघुवंशी सर (केंद्रप्रमुख खारतळेगाव),मा.निताताई सोमवंशी (केंद्रप्रमुख गणोरी),मा.बाळासाहेब धनस्कर (केंद्रप्रमुख पूर्णानगर),मा.रविंद्रजी धरमठोक (केंद्रप्रमुख वाठोडा शुकलेश्वर),मा.उमेशभाऊ चुनकीकर (केंद्रप्रमुख खोलापूर),मा.किशोरजी रुपणारायन (केंद्रप्रमुख आसरा) शैलेंद्र स.दहातोंडे व सर्व विषय साधन व्यक्ती/विषय तज्ञ (पं. स.भातकुली) उपस्थित होते.
सभेमध्ये मा.रामेश्वरजी माळवे यांनी शाळा प्रवेशोत्सव संबंधाने मार्गदर्शन केले,ज्यामध्ये
शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सभेचे आयोजन करणे.शाळा पूर्व तयारी संबंधाने शाळा स्वच्छता करणे,शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश,पाठ्यपुस्तकांचे वाटप करणे.नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करणे. शालेय पोषण आहार मध्ये गोड पदार्थाचा समावेश करणे.योगदिन साजरा करणे.यासह अन्य महत्त्वाच्या सूचना दिल्या.
तसेच मा.रूपालीताई शिरोटे,यांना udise plus व Saral संबंधीची विस्तृत माहिती दिली व कोणालाही काही अडचण असल्यास आमच्यासोबत संपर्क साधावा असे आश्वस्त केले.
पंजाबराव पवार यांनी युवा कौशल्य अंतर्गत स्वयंसेवक याबाबत माहिती दिली,आपण याआधी ज्या स्वयंसेवकांची युवा कौशल्य अंतर्गत नियुक्ती केली होती त्यांना पुन्हा पाच महिन्यासाठी नियुक्त करायचे आहे,ही नियुक्ती १ जुलै २०२५ पासून करायचे आहे,त्यांना मानधन १ जुलै २०२५ पासून सुरू होणार आहे,परंतु ते स्वयंसेवक जर २३ जून पासून शाळेमध्ये येण्यास तयार असतील तर त्यांना येऊ द्यावे मात्र त्यांच्या पुन्हा सेवेची सुरुवात ही १ जुलै २०२५ पासूनच होणार आहे,अशा प्रकारच्या सूचना साहेबांनी दिल्या.
या सभेचे सूत्र संचालन शेख शकील सर व शैलेंद्र स.दहातोंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जानरावजी सुलताने सर व मा.रवींद्रजी धरमठोक सरांनी मानले.
गटशिक्षणाधिकारी यांच्या कडून सर्व शिक्षक बंधू भगिनींना नवीन शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा देण्यात आल्या.सभेला भातकुली पं.स.मधिल मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका,विषय साधन व्यक्ती उपस्थित होते.असे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
======================