पं.स.भातकुली चे शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्न.
शाळा विकासास,शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका महत्वाची... मा.दिपक कोकतरे (गटशिक्षणाधिकारी)
भातकुली/अमरावती :- पं.स.भातकुली अंतर्गत जि.प.व्यवस्थापनाच्या मराठी माध्यमातील शाळेतील शिक्षकांकरिता शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षणाचे आयोजन विध्यानिकेतन अमरावती येथे करण्यात आले होते.
'हीच आमुची प्रार्थना अन आमुचे मागणे' या सुंदर अशा प्रार्थनेने प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली,त्यानंतर तज्ञ मार्गदर्शक दीपिका भारती यांनी शाळा व्यवस्थापन समिती रचना कार्ये व जबाबदारी,शैलेंद्र स.दहातोंडे यांनी निपुण भारत अभियान (FLN),सामाजिक अंकेक्षण, आपत्ती व्यवस्थापन, शाळा विकास आराखडा,मीनाक्षी खरटमोल यांनी बालकांचे हक्क व अधिकार,त्यासंबंधीचे विविध कायदे तर प्रकाश देशमुख यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण व शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले.उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी यांनी गटकार्यामध्ये सहभागी होवून दिलेल्या विषयावर गटकार्य करून सादरीकरण केले.
या प्रशिक्षणाला मा.दिपकजी कोकतरे (गटशिक्षणाधिकारी, पं. स.भातकुली),मा.नरेंद्रजी गायकवाड (अधिक्षक शालेय पोषण आहार),मा. शकील अहमद खा सर (शिक्षण विस्तार अधिकारी)यांनी भेटी देवून मार्गदर्शन केले,शाळा विकासामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका अतिशय मोलाची आहे, असे प्रतिपादन मा.दिपकजी कोकतरे साहेबांनी केले.
प्रशिक्षणाला ९१ मुख्याध्यापक,शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते,प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी .चंद्रकांत कडबे सरांनी विशेष मेहनत घेतली,जेवणानंतर प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली.