• Total Visitor ( 85003 )

पुणे ग्रामीण पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचा-याची गळफास घेवून आत्महत्या

Raju Tapal November 04, 2021 41

पुणे ग्रामीण पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचा-याची  गळफास घेवून आत्महत्या 

           

पुणे ग्रामीण पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचा-याने राहत्या घरी गळफास घेवून आत्भहत्या केल्याची घटना घडली. 

दिपाली बाबूराव कदम वय -26 असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीसाचे नाव आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी या महिला पोलीसाने आपल्या भावाला मोबाईलवर सुसाईड नोट पाठविली. त्यानंतर पोलीस नाईक वाल्मिक गजानन अहिरे यांच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन वर्षापूर्वी  दिपाली हिची पोलीस नाईक वाल्मिक अहिरे याच्यासोबत ओळख झाली होती. ओळखीचा फायदा घेवून वाल्मिक अहिरे दिपाली कदम या महिला पोलीसाला शारीरिक, मानसिक त्रास देत होता. दरम्यान दिपालीचे लग्न ठरले होते.

31 ऑक्टोबरला तिचा साखरपुडा झाला होता. 16 नोव्हेंबरला विवाह होणार होता.

दिपालीचे लग्न ठरल्याने आरोपी वाल्मिक अहिरे याने दिपालीच्या होणा-या पतीला फोन करून तिच्यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर दीपालीच्या भावालाही फोन करून तुम्ही तिचे इतर कोणाशीही लग्न करू नका नाहीतर मारून टाकेल अशी धमकी दिली. या सर्व प्रकारानंतर दिपाली हिने बुधवारी पहाटेच्या सुमारास राहात्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.याप्रकरणी तिचा भाऊ रोहित कदम यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

Share This

titwala-news

Advertisement