पुणे जिल्ह्यात वाचन चळवळ उभी करण्यात ज्ञानेश्वर भोईटे गुरूजी यांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे. वाचन संस्कृती वाढून तरूणांनी स्पर्धा परिक्षेत यश मिळवावे .भागवत सांप्रदायाची पताका जिल्हाभर पोहोचविण्याचे काम भोईटे गुरूजी आजही पंच्याऐंशी वयात करीत आहेत. भोईटे गुरूजींचा आदर्श समाजापुढे आहे असे गौरवोद्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढले.
पुरंदर तालुक्यातील संत सोपानकाका भागवत संप्रदायाचे सरचिटणीस, श्री मल्हार शिक्षण मंडळ कोथळेचे उपाध्यक्ष ,ज्ञानरंजन वाचनालयाचे संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी यांची ग्रंथतुला माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
या कार्यक्रमात माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते.
पुरंदर तालुक्यातील कोथळे येथे ज्ञानरंजन वाचनालयाच्या वतीने ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी यांची ग्रंथतुला तसेच स्वर्गीय हिराबाई ज्ञानेश्वर भोईटे स्पर्धापरीक्षा अभ्यासिकेचा शुभारंभ माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पार पडला. माजी आमदार दीपक पायगुडे,भाजपाचे नेते बाबाराजे जाधवराव,जेष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार,शेतकरी नेते सतीश काकडे,कात्रज दुध संघाचे संचालक गंगाराम जगदाळे,संजय चव्हाण, जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे,पदाधिकारी पांडुरंग सोनवणे,रवींद्र जोशी,नीरा मार्केट समितीचे संचालक ऍड धनंजय भोईटे,सरपंच शहाजी जगताप,माजी सरपंच वसंतराव जगताप,उपसरपंच वंदना जगताप,धालेवाडी गावाचे सरपंच शरद काळाने,राहुल भोसले सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग जगताप, माजी अध्यक्ष सुभाष जगताप सामाजिक कार्यकर्ते महादेव जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व ज्ञानरंजन वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश भोईटे यांच्या पुढाकारातून कोथळे येथे ३० लक्ष रुपये खर्चून ग्रंथालयाची इमारत बांधण्यात आली असून या ग्रंथालयात आठ हजाराहून अधिक ग्रंथ व पुस्तके आहेत. ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेसाठी तरुण पुढे जावेत या हेतूने अभ्यासिका सुरु करण्यात आल्याचे प्रास्ताविकात संदीप जगताप यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानरंजन वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश भोईटे, पदाधिकारी दत्तात्रय भोईटे, प्रा.प्रताप भोईटे, तुषार काकडे, गणेश जगताप गणेश थोरात,अभिजित जगताप,धनंजय जगताप,अक्षय जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक गोविंद लाखे यांनी तर आभार ऍड.धनंजय भोईटे यांनी मानले.