पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर व सणसवाडी या दोन ग्रामपंचायतींचे नगरपंचायतींमध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी शिरूर हवेलीचे आमदार ऍड. अशोक रावसाहेब पवार यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात असे म्हटले आहे की, माझ्या शिरूर हवेली मतदार संघातील शिक्रापूर व सणसवाडी ता.शिरूर जि.पुणे येथील शिक्रापूर ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या २० हजार २६३ इतकी आहे. तसेच सणसवाडी ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या १३ हजार ५४३ इतकी आहे. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरणात वाढ होत असल्याने शिक्रापूर व सणसवाडी या दोन ग्रामपंचायतींचे नगरपंचायतींमध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी आमदार ऍड. अशोक पवार यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे.