पुणे नाशिक महामार्गावर आळेखिंड परिसरात आयशर टेम्पोला आग लागल्याची घटना घडली.
पुणे येथून एम एच ०४ इ एल ७७३४ या क्रमांकाचा आयशर टेम्पो पुठ्ठा घेवून नाशिककडे जात होता. आळेफाट्याच्या पुढे आळेखिंड परिसरात या वाहनाला आग लागली. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने वाहन थांबवून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. लागलेल्या आगीत काही वेळातच संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला. या घटनेने महामार्गावर नाशिकच्या दिशेने जाणा-या वाहनांची वाहतूक कोंडी झाली.
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी योग्य त्या सुचना दिल्यानंतर पोलीसांनी पुणे नाशिक अशी वाहतूक एकेरी वळविली.