पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कृती समितीचा बेमुदत संप सुरू
Raju Tapal
December 22, 2021
63
पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कृती समितीचा बेमुदत संप सुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर सेवक कृती समितीने प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे.
विद्यापीठातील बहुतांंश शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर शिक्षकेतर कर्मचा-यांनी निदर्शने केली.
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत १०, २०, ३० वर्षे सेवेनंतरची तीन लाभाची योजना विद्यापीठीय, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-यांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी , अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अकृषी विद्यापीठातील उर्वरित ७९६ पदांचा सातवा वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचनेचा शासन निर्णय त्वरीत जाहीर करावा या मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर सेवक कृती समितीने बेमुदत संप मंगळवारपासून सुरू केला आहे.
महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या पदाधिका-यांनी मागील आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय साम़त यांची भेट घेतली या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्याने सेवक कृती समितीने बेमुदत संपाची भुमिका घेतली.
या संपात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षकेतर कृती समिती सहभागी झाल्याची माहिती विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष बंडू ब्रम्हे यांनी पत्रकारांना दिली.
शासकीय कर्मचा-यांप्रमाणे महाविद्यालयीन, विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, पदोन्नती मिळालेल्या कर्मचा-यांना पदोन्नती पदाचे निवृत्ती वेतन द्यावे, अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचा-यांना सातवा वेतन लागू करावा, २००५ नंतर नियुक्त.कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मागण्या प्रलंबित आहेत.
Share This