पुण्यातील कात्रज परिसरात तरूणाची गोळीबार करून हत्या
पुण्यातील कात्रज परिसरात एका गोल्ड मॅन तरूणाची गोळीबार करून हत्या करण्यात आली.
समीर उर्फ सम्या मणूर वय - ४० रा.आंबेगाव ,पुणे असे गोळीबारात हत्या करण्यात आलेल्याचे नाव आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौकीपासून हाकेच्या अंतरावर आंबेगाव येथील चंद्रभागा चौकात गोळीबाराची ही घटना घडली.
गोल्डमॅन म्हणून परिसरात परिचित असलेला समीर हा चौकात उभा राहिला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अगदी जवळून गोळीबार कैला.
मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून त्याचा मृत्यू झाला.
भरदुपारी गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली. गुन्हे शाखेची पथके तसेच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
समीर मणूर काँग्रेस कार्यकर्ता असल्याचे समजते.