राजन तेली पाठोपाठ विशाल परब यांच्या भूमिकेकडे लक्ष
Raju tapal
October 19, 2024
41
राजन तेली पाठोपाठ विशाल परब यांच्या भूमिकेकडे लक्ष..
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचेच नाव जनमानसात आघाडीवर...
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विशाल परबांचे नाव आघाडीवर...
विशाल परब भाजप पक्ष सोडून अपक्ष लढणार की? अन्य पक्षात प्रवेश करणार की?भाजपमध्ये वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर भाजपमध्येच थांबणार?याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले असले तरी
विशाल परब हे अपक्ष लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली
सिंधुदुर्ग:-भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज शुक्रवारी ठाकरे गटात उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश केला.तर भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब हेही सावंतवाडी विधानसभेसाठी इच्छुक असून,त्यांनी गेली ३ ते ४ वर्षे मतदारसंघात फिरून भाजपचा प्रचार सुरू केला.सामाजिक जाणिवेतून मदतकार्य देखील मोठ्या प्रमाणावर केले.अनेक ठिकाणी मंदिर आदी जिर्णोद्धारसाठी निधी देखील उपलब्ध करून दिला.आपल्या दानशूरपणातून अनेकांना सतत मदतीला धावणारे युवा नेतृत्व श्री विशाल परब यांची तरुणाईत मोठी क्रेझ आहे. एवढेच नव्हे तर त्यांचा छोट्या छोट्या बच्चेकंपनीत प्रचंड फॅन फॉलोअर आहे. दिलेला शब्द पुर्ण करणारा युवा नेता अशी त्यांची ओळख असल्याने ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, युवा वर्ग आणि तमाम मायमाऊलींमध्ये त्यांच्याबद्दल "आमचो भाव... आमचो झील" अशी एक वेगळीच आपुलकी असलेली दिसून येते.दरम्यान विशाल परब हे अपक्ष लढणार की? दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार की? भाजपच्या वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर भाजपमध्येच थांबणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान विशाल परब हे अपक्ष लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली
सावंतवाडी मतदारसंघात महायुतीकडून दिपक केसरकर यांनाच उमेदवारी जाहीर होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.आता तर भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख व माजी आमदार राजन तेली यांनी शुक्रवारी उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश केला.सावंतवाडी विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी राजन तेलींना दिपक केसरकर यांच्याविरोधात उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तेलींना उमेदवारी दिली जाणार आहे.कुठूनही केसरकर यांना या निवडणुकीत पाडण्याचा विडाच ठाकरे गटाने उचलला आहे.असे जरी असले तरी राजन तेलींना कितपत यश मिळेल हे निवडणुकीनंतर कळणार आहे.
दिपक केसरकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन सावंतवाडी मतदारसंघात मोठे लीड दिले होते.राणे विजयी झाल्यानंतर केसरकर यांच्यावर खुश झाले.तर एकेकाळी कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणेंचा प्रचार अखेर यावेळी दिपक केसरकरांना करावा लागला.
गणेश चतुर्थीच्या काळात दिपक केसरकर यांनी गणेश भक्तांच्या स्वागताचे बॅनर सावंतवाडीसह वेंगुर्ले तालुक्यात लावून त्या बॅनरवर आपल्या फोटोसोबत नारायण राणेंचा फोटो लावल्याने,मतदारसंघात जोरदार चर्चा झाली होती.आता दिपक केसरकरांसमोर विशाल परब व राजन तेली,यांच्याशी सामना करावा लागणार आहे.त्यामुळे केसरकरांना हि निवडणुक कठीण जाणार हे निश्चित.
Share This