राजेश भांगे राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराने सन्मानीत
राजेश भांगे यांना सन 2024 चा राज्यस्तरीय उत्कृष्ट समाज रत्न पुरस्कार रविवारी बदलापूर येथे देण्यात आले .
आबेळे खु .सराईवाडी या गावात भारत स्वतंत्र झाल्यानंतर रस्ता पाणी यांची सोय नसल्याने राजेश भांगे यांनी याबाबत तहसीलदार कार्यालय ठाणे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर साखळी आंदोलन. 2022 साली केले होते यांची दखल शासनाने घेतली आणि सराईवाडी रस्ता पाणी सोय करून दिली याची नोंद प्रेरणा फाऊंडेशन अधिक्षीका प्रेरणा कुळकर्णी यांनी घेऊन सन्मान पत्र देऊन पुरस्कार जाहीर केले राजेश भांगे हे सतत कोणत्याही गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण साहित्य वाटप करत असतात याची दखल घेऊन हे पुरस्कार देण्यात आले .