• Total Visitor ( 84165 )

राज्यात 57 वर्षांत फक्त 161 महिला आमदार झाल्या

Raju tapal October 22, 2024 23

राज्यात 57 वर्षांत फक्त 161 महिला आमदार झाल्या,
आतापर्यंत 1 हजार 56 महिलांनी लढवली होती निवडणूक

मुंबई:-संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. महिला सक्षमीकरणापासून ‘माझी लाडकी बहीण’ अशा विविध योजना राबवल्या जात आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांपासून सचिव आणि मंत्रीपदासारख्या महत्त्वांच्या पदांवर सक्षम महिला विराजमान आहेत. पण तरीही राज्यात मागील 57 वर्षांत झालेल्या विधानसभेच्या तेरा निवडणुकांमध्ये आतापर्यंत फक्त 161 महिला आमदार निवडून आल्याची आकडेवारी पुढील महिन्यात होणाऱया विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पुढे आली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सध्याच्या चौदाव्या विधानसभेत 24 महिला आमदार आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार फक्त महिला आमदारांचे प्रमाण फक्त 8.33 टक्के आहे. यातील बहुतांश महिला आमदारांना राजकीय काwटुंबिक पार्श्वभूमी आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत एपूण 239 महिला निवडणूक रिंगणात होत्या. त्यापैकी 189 महिलांचे डिपॉझिट जप्त झाले. मात्र 24 महिला निवडून आल्या. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे 2022 मध्ये दुर्दैवाने निधन झाले. त्यानंतर तीन वेगवेगळय़ा विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकीत तीन महिला आमदार निवडून आल्या. त्यामुळे महिला आमदारांची संख्या 26 झाली.

15 वर्षांत महिला आमदारांची संख्या वाढली

मागील दहा वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महिला आमदारांची संख्या वाढली आहे. 2014 मध्ये एपूण 277 महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी 20 महिला आमदार निवडून आल्या, तर 2009 मध्ये 211 महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी 11 महिला आमदार निवडून आल्या. 1972 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एपूण 56 महिला उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या, पण त्या वर्षी एकही महिला आमदार निवडून आली नाही.

महिला आमदार ते खासदार

त्यानंतर आता लोकसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड आणि प्रतिभा धानोरकर या तीन महिला आमदार या खासदार झाल्या. खासदार झाल्यामुळे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामध्ये कोणता राजकीय पक्ष किती महिलांना उमेदवारी देतो हे लवकरच स्पष्ट होईल.
 

Share This

titwala-news

Advertisement