,राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येवो
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे भराडी देवीकडे साकडे
मालवण :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व डोंबिवली मतदार संघातून भाजपची उमेदवारी जाहीर झालेले ना. रवींद्र चव्हाण यांनी आज मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी चव्हाण यांनी भराडी मातेसमोर नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. तसेच राज्यातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येवोत व राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येवो, असे साकडे आपण भराडी देवीकडे घातल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, छोटू ठाकूर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, ललित चव्हाण, राजू परुळेकर, बाबू आंगणे, संतोष कोदे, महेश बागवे, राजन वराडकर, महेश मांजरेकर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भास्कर आंगणे, बाळा आंगणे यांनी आंगणे कुटुंबियांच्यावतीने ना. चव्हाण यांचे स्वागत केले.