• Total Visitor ( 134168 )

रेडी रेकनर दरात दोन वर्षांनी वाढ

Raju tapal April 01, 2025 27

रेडी रेकनर दरात दोन वर्षांनी वाढ;
महानगरपालिका क्षेत्रात 5.95% तर ग्रामीण भागात 3.36% वाढ, 
आजपासून नवे दर लागू

मुंबई :- आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारने रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात 5.95% (मुंबई वगळता) एवढी वाढ करण्यात आली आहे.तर ग्रामीण भागात 3.36% वाढ करण्यात आली आहे.

प्रभाव क्षेत्रात 3.29%, नगरपरिषद / नगर पंचायत क्षेत्र 4.97%, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र सरासरी वाढ 3.39% अशी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ पाहता राज्यात सरासरी 4.39% (मुंबई वगळता) व राज्याची एकूण रेडीरेकनर दरातील वाढ ही 3.89% करण्यात आली आहे.

सन 2017-18 साली वार्षिक रेडी रेकनर रेट तयार करणेत आले होते. त्यानंतर सलग 2 वर्षे स्थावर मिळकत क्षेत्रातील मंदीचा विचार करुन (सन 2018-19 व 2019-20) साठी सदर दर कायम ठेवण्यात आले होते. यानंतर कोरोना संकटामुळे विचार करून हे दर कमी प्रमाणात वाढविण्यात आले होते. ते पुढे 2022-23 मध्ये वाढविण्यात आले. तसेच हेच दर पुढील दोन वर्षे म्हणजे 2024-25 करिता कायम ठेवण्यात आले होते.
 

Share This

titwala-news

Advertisement