निवडणूक विषयक नियमित चालणाऱ्या BLO म्हणून कामातून राज्यातील
प्राथमिक शिक्षकांना मोकळे करा
प्राथमिक शिक्षक समितीचे शालेय शिक्षणमंञी,प्रधान सचिव,उपसचिव तथा राज्य निवडणूक अधिकारी यांना निवेदन
अमरावती - शैक्षणिक-अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाचा शासन निर्णय दि. २३ ऑगस्ट २०२४ मधील परिशिष्ट -२ "अशैक्षणिक कामे" अ.क्र.२ ला अनुसरून BLO कामातून शिक्षकांना मोकळे करण्याबाबत निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र,मंत्री (शालेय शिक्षण), राज्यमंत्री (शालेय शिक्षण),प्रधान सचिव (शालेय शिक्षण), आयुक्त (शिक्षण), उपसचिव (शालेय शिक्षण), मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनाही पाठविण्यात आले आहे.असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
मतदार नोंदणी व मतदार यादी पुनरिक्षण विषयक कामासाठी मागील कित्येक वर्षांपासून सातत्याने प्राथमिक शिक्षकांना नियुक्त केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांत पुरेसे शिक्षक नाहीत. ९०% पेक्षा अधिक प्राथमिक शाळांत स्वतंत्र मुख्याध्यापक नसून शिक्षकालाच मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी पार पाडावी लागते, एकाच शिक्षकाकडे २-३ इयत्तांच्या अध्यापनाची जबाबदारी आहे. अशातच सतत वर्षभर नियमित चालणाऱ्या मतदार नोंदणी व मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामासाठी BLO म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांना नियुक्त केले जात आहे.
शिक्षकांकडे अनेक प्रकारची अशैक्षणिक कामे दिल्याने दैनंदिन अध्यापन कार्यावर विपरीत परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दुष्परिणाम होत असल्याने राज्य शासनाने शासन निर्णय दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी निर्गत केला आहे. त्यातील परिशिष्ट व अशैक्षणिक कामे - (२) प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे करणे, BLO चे मतदार नोंदणी आणि मतदार यादी पुनरिक्षण, ओळख पत्र तपासणी, वितरण इत्यादी कामे प्रत्यक्ष निवडणूक संबंधित नाही. त्यामुळे BLO म्हणून शिक्षकांना दिले जाणारे मतदार यादी पुनरीक्षण हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेचे काम नसल्याने सदर काम अशैक्षणिक स्वरूपाचे असल्याने या कामासाठीप्राथमिक शाळांतील शिक्षकांना नियुक्ती देऊ नये -१ च्या शासन निर्णयानुसार स्पष्ट होते.तरीसुद्धा अजूनही प्राथमिक शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती रद्द झालेली नाही; उलट नव्याने पुन्हा नियुक्ती करण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांना BLO म्हणून नियुक्ती रद्द होण्यासाठी निवेदन पाठविले आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून आग्रही विनंती करण्यात आली की- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाचा प्राधान्याने विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या BLO म्हणून केलेल्या नियुक्ती तातडीने रद्द करण्यासाठी आपल्या स्तरावरून जिल्हा,
तालुका स्तरावर निवडणूक यंत्रणेस कळविण्यात यावे.
अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने राज्याचे शिलेय शिक्षण मंञी दादाजी भुसे,प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम व उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांना केले आहे.
बाँक्स-
अशैक्षणिक कामे:-
१. गावात स्वच्छता अभियान राबविणे.
२. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमित चालणारी काम करणे.
३. हागणदारीमुक्त अभियान राबविणे,
४इतर विभागाच्या विविध योजनांसाठी विद्यार्थी लाभार्थी म्हणून पहिल्यांदा नोंद केल्यानंतर पुढील वर्गासाठी परत परत नोंदणी करणे.
५. गावातील तंटामुक्ती व इतर समित्यांवर सदस्य म्हणून काम करणे.
६. इतर संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आयोजित करणे,
७. शासन किंवा शासनाच्या संस्था जसे शिक्षण आयुक्तालय, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, यांच्या मान्यतेने स्वयंसेवी संस्था किंवा अन्य बाहयसंस्था यांचेसोबत झालेले सामंजस्य करार वगळून इतर स्वयंसेवी संस्था किंवा अन्य बाहयसंस्था यांचेकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होणे. करून घेणे.
८. विविध प्रकारची सर्वेक्षणे त्यामध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचे सर्वेक्षण, पशु सर्वेक्षण, शौचालय सर्वेक्षण इत्यादी सर्वेक्षणाचे काम करणे.
९. शालेय कामकाजाव्यतिरिक्त अन्य विभागांची माहिती संकलित करून त्या विभागाच्या अॅप/संकेतस्थळावर नोंद करणे.
१०. जी माहिती संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध आहे, ती माहिती ऑफलाईन पद्धतीने दुबार मागविणे.
११. अनावश्यक प्रशिक्षणे, कार्यशाळा, उपक्रम, अभियाने, मेळावे इत्यादी शासनाच्या मान्यतेशिवाय राबविले जाणे. शासन मान्यता नसलेल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमात शिक्षकांनी कर्तव्य कालावधीत ऑनड्यूटी सहभाग घेणे.
१२. शिक्षण विभागाकडील कामाव्यतिरिक्त अन्य विभागाकडून देण्यात येणारी कामे.