रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन,
राज्य सरकारने अनु सुचित जाती जमाती कायदयाचा तपास कनिष्ठ अधिकारी यांना दिल्या मुळे त्याच्या निषेधथा रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया ए यांच्या वतीते कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांना निवेदन देण्यात आले,
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अण्णा साहेब रोकडे, जिल्हा महासचिव भिमराव डोळस,जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष जयवंत सोनावणे, संतोष जाधव, वाहतूक आघाडी जिल्हा अध्यक्ष विलास गायकवाड, मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर, बि के गायकवाड, बाळा बनकर, विशाल शेजवळ,रमेश बनसोडे, जालिंदर बवै,मिना साळवे, माया अहिरे, अनिल निकाळजे, आदी उपस्थित होते,
यावेळी ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष जयवंत सोनावणे यांनी सांगितले की अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा असून हया तपास एसीपी/डि वाय एस पी यांच्या कडे होता, परंतु राज्य सरकारने आता हा तपास कनिष्ठ दजौचा अधिकारी यांच्या कडे सोपवली आहे, त्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो, कनिष्ठ अधिकारी आमची तक्रार घेत नाही, आम्ही न्याय मागण्या साठी जातो उलट आमच्यावर अन्याय केला जातो, खोटे नाटे गुन्हे दाखल करण्यात येतात, आम्हाला न्याय मिळत नाही, पुरवी प्रमाणे वरिष्ठांन कडे तपास सोपविण्यात यावा अशी आमची मागणी आहे,