रिक्त झालेल्या स्विकृत नगरसेवकपदावर भाजपचे रवींद्र काकडे
भाजपचे स्विकृत नगरसेवक प्रसाद पिंगळे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने वडगाव नगरपंचायतीच्या ता.मावळ रिक्त झालेल्या स्विकृत नगरसेवकपदावर भाजपचे रविंद्र ज्ञानेश्वर काकडे यांची निवड करण्यात आली.
पिठासिन अधिकारी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्षा पुजा वहिले, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, मुख्याधिकारी जयश्री काटकर गटनेते राजेंद्र कुडे, प्रमिला बाफना, दिनेश ढोरे यांच्या उपस्थितीत विशेष सभेत रविंद्र काकडे यांची निवड जाहिर करण्यात आली.
विशेष सभेस नगरसेवक प्रविण चव्हाण, सुनील ढोरे, चंद्रजित वाघमारे,राहूल ढोरे, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, माया चव्हाण, शारदा ढोरे, पुनम जाधव, सायली म्हाळसकर, सुनिता भिलारे, दीपाली मोरे उपस्थित होते.
निवडीनंतर मावळ भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, सचिव अनंता कुडे विश्वस्त किरण भिलारे आदींनी काकडे यांचा निवडीनंतर सत्कार केला.