रोहिले बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा
Raju Tapal
January 27, 2022
30
रोहिले बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा, सरपंच ठकुबाई देविदास पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण
नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील जिल्हा परिषदेच्या रोहिले बुद्रुक प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. 26 जानेवारी 2022 रोजी बुधवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने रोहिले बुद्रुक प्राथमिक शाळेतील ध्वजाचे ध्वज पूजन प्राथमिक शाळे शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ कल्पना अनिल आरबुज यांच्या हस्ते करण्यात आले. तर रोहिले ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देविदास पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कोरोनाचे तिसऱ्या लाटेच्या संकटामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले नाही. राष्ट्रध्वजाला राष्ट्रगीत म्हणून सलामी देण्यात आली. यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्राथमिक शाळेत उपस्थित असलेले आर्मी मध्ये (सैन्यदलामध्ये) कार्यरत असलेले गावातीलच दिवंगत कै. देविदास सावळीराम पवार यांचे सुपुत्र रोहिले बुद्रुक गावाचे भूमिपुत्र लक्ष्मण देविदास पवार यांचा रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच सौ सुनंदा मुक्ताराम बागुल यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किरण सूर्यवंशी, रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई पवार, उपसरपंच सुनंदा बागुल, ग्रामपंचायत सदस्य रामदास सावळीराम पवार, सुरेश भास्कर बागुल, सोपान दत्तू गायके, अंगणवाडी सेविका संगीता विकास कुलकर्णी, कार्यकर्त्या इंदुबाई कारभारी पवार, इंदिरा संजय पवार, बाबासाहेब तुकाराम अरबुज, चंद्रकांत आसाराम बागुल, रवींद्र यादव बागुल, रवींद्र अशोक गायके, वाल्मीक गायके, व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
Share This