रोहिले बुद्रुक येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्ताने सरपंच ठकुबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली बाल सभा व ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.
नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील मौजे रोही बुद्रुक येथील ग्रामपंचायतीतर्फे शासनाच्या आदेशान्वये राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्ताने बालकांची बालसभा व ग्रामसभा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या शांततापूर्ण वातावरणात सरपंच ठकुबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
शासनाच्या आदेशान्वये मौजे रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात प्रथम शाळेतील बालकांची बालसभा घेऊन या सभेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या मागण्या केल्या असून त्यापैकी प्रथम येथील बालकांना बोलठाण येथील शाळेत जाण्या-येण्यासाठी रस्ता व्यवस्थित नसून कोणतेही साधन नाही तरी एस टी , बसेस सुरु करून आम्हाला होणारा त्रास दूर करावा अशी मागणी केली व त्यावर चर्चा करून ठराव संमत करण्यात आला.
यानंतर येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेत येथील विद्यार्थ्यांच्या बालकांच्या होणारी गैरसोय त्रास लक्षात घेता एसटी महामंडळाकडे सदर ठराव पाठविणार असून बोलठाण येथे जाणे येणे साठी एसटी सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन नांदगाव पत्रकार व ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य मुक्ताराम बागूल यांनी दिले.
मौजे रोहिले बुद्रुक येथील झालेल्या बाल सभा व ग्रामसभेचे वेळी ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देविदास पवार, ग्रामपंचायत सदस्य रामदास सावळीराम पवार, सुरेश भास्कर बागुल, शाळेचे मुख्याध्यापक किरण सूर्यवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव पंचायत समितीचे प्रमोद नवले तसेच गावातील ग्रामस्थ नागरिक , आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.