रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्किट वाटप
Raju Tapal
December 13, 2021
42
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रुक्मिणी बाई रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण पश्चिम विधानसभा संघटक सचिव दिपक काळे यांनी केले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण पश्चिम विधानसभा संघटक सचिव दिपक काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ब प्रभाग ब्लॉक अध्यक्ष भगवान साठे, महिला विभाग अध्यक्षा वनिता निवाते, ब प्रभाग उपाध्यक्ष प्रशांत निवाते, विभाग अध्यक्ष दिपक विनेरकर, वॉर्ड अध्यक्ष 38 चे अलेक्स म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी विभाग सरचिटणीस निखिल माने, वासूदेव निकम, वॉर्ड अध्यक्ष अमित खोत उपस्थित होते. यावेळी दिपक काळे यांनी रुग्णाची भेट घेतली तसेच डॉक्टराची भेट घेऊन विचारपूस केली. रुग्णालयात स्टाफला किंवा रुग्णांना होणारी आडचणी असल्यास सोडविण्यासाठी आरोग्य मंत्र्याकडे पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.
Share This