रूपालीताईने पक्षाचा राजीनामा दिल्याचं दु:ख नाही - ऍड. स्वप्निलभैय्या माळवे
रूपालीताईने पक्षाचा राजीनामा दिल्याचं दु:ख नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे शिरूर तालुकाध्यक्ष ऍड. स्वप्निलभैय्या माळवे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा रूपालीताई ठोंबरे पाटील यांनी पक्षाच्या दिलेल्या राजीनाम्याबाबत व्यक्त केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा रूपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या सर्व पदांसह पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
रूपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्या कार्यरत होत्या.
मूळ वकील असलेल्या रूपाली पाटील ठोंबरे या मनसेच्या स्थापनेपासून गेल्या १४ वर्षापासून राज ठाकरे यांच्यासोबत आहेत . महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत त्या मनसेच्या तिकीटावर नगरसेवक झाल्या. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. विधानसभेच्या निवडणुकीत त्या कसबा मतदारसंघातून मनसेकडून निवडणूक लढविण्यास इच्छूक होत्या.
रूपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला.
आपले आशिर्वाद आणि श्री. राज ठाकरे हे नाव हृदयात कोरलेले कायम राहील अशी भावना व्यक्त करत राजीनामा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून त्यांना ऑफर असल्याची चर्चा आहे.
मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षा रूपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाचा दिलेल्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे शिरूर तालुकाध्यक्ष ऍड. स्वप्निलभैय्या माळवे यांनी म्हटले आहे की, सन्माननीय राज ठाकरे यांनी या अगोदरच सांगितलं आहे की माझ्या पक्षाचं झाड हे मी खडकावर लावलं आहे. त्याला फळं उशिरा येतील ज्यांना घाई झाली असेल त्यांनी पक्षातून गेलं तरी चालेल तसेच राजसाहेब यांनी हे ही स्पष्ट केलं आहे की आमदार, खासदार, नगरसेवक कार्यकर्ते येतात जातात .मात्र पक्ष आहे तिथेच असतो.
रूपालीताईने पक्षाचा राजीनामा दिल्याचं दु:ख नाही मात्र राजीनामा का दिला ? याचा विचार होणं गरजेच. कारण पक्ष वाढीसाठी एक - एक कार्यकर्ता महत्वाचा असतो .आणि हे संघटन करताना अनेक श्रम घ्यावे लागतात हे ही तितकचं खरं !
अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे शिरूर तालुकाध्यक्ष ऍड. स्वप्निलभैय्या माळवे यांनी रूपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाचा दिलेल्या राजीनाम्याबाबत व्यक्त केली.