धावण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटवलेल्या ऋषिकेश काटे या तरुणाचे स्वागत
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश नाना काटे या तरुणाने हरियाणामधील सोनीपथ येथे नुकतेच धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक करून सुवर्णपदक पटकावल्याने याचे जातेगाव मध्ये येताच ढोल-ताशांच्या गजरात आतषबाजी करून भव्य स्वागत करण्यात आले. असून गावात ठिकाणी नागरिकांनी औक्षण करून शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी ऋषिकेश काटे याने आपल्या घरी त्याने अगोदर जातेगाव येथील ग्रामदैवत श्री पिनाकेश्वर महादेव, श्री छत्रपती शिवाजी महाराज, व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.
यावेळी ऋषिकेश पाटील याने आपले मनोगत व्यक्त करताना युवा नॅशनल चॅम्पियन 2021 या राष्ट्रीय शाळेच्या स्पर्धेत देशातून आणि महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून तरुणांनी भाग घेतला होता. त्यापैकी दहा किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत जम्मू येथील स्पर्धकाला मत देऊन अव्वल नंबर प्रथम क्रमांक पटकावला असल्याचे सांगितले व आपल्याला शिर्डी येथील प्रमोद कदम आणि रणवीर जगताप या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ग्रामदैवत श्री पिनाकेश्वर महादेव व श्री साईबाबा यांच्या आशीर्वादाने आणि आई वडील परिसरातील सर्व सदस्यांचे वेळोवेळी प्रोत्साहन दिल्याने हे मला शक्य झाल्याचे बोलताना सांगितले.