अखेर युक्रेनसोबत युद्धविराम करण्यास रशिया तयार
अमेरिकेच्या प्रस्तावाला पुतीन यांचा होकार
मॉस्को :-रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्यासाठी मागील काही महिन्यांपासून हालचाली सुरू आहेत. युद्धविराम करण्यासंदर्भात आता पुतीन यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादीमीर पुतीन यांच्या युद्ध थांबवण्याबद्दल सकारात्मक चर्चा झाली असून, 'हा प्रस्ताव योग्य आहे. आम्ही याचे समर्थन करतो. पण, मुद्दे आहेत ज्यावर आम्हाला चर्चा करणे गरजेचे आहे', असे पुतीन म्हणाले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले की, यूक्रेनच्या निर्णयावर इतके लक्ष ठेवणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांचे आभार व्यक्त करतो. कारण त्यांचा उद्देश एक मोठ्या मिशनीची प्राप्ती आहे. ज्यामुळे संपत्तीचे होणारे नुकसान आणि जीवीतहानी टाळता येईल. युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्यासंदर्भात झालेल्या चर्चेवर क्रेमलिनने तडजोडी होऊ शकतात, असे म्हटले आहे. ट्रम्प पुतीन यांना म्हणाले की, रशियाच्या सैन्याने हजारो युक्रेनच्या जवानांना घेरले आहे आणि ते आता खूप बिकट अवस्थेत आहेत.
पुतीन यांना विनंती आहे की, या जवानांना जीवदान द्यावे." अमेरिकेने रशियासमोर ३० दिवस युद्धविराम करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ज्यावर पुतीन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. रशियाची राजधानी मॉस्को येथे गुरुवारी पुतीन यांची पत्रकार परिषद झाली. या प्रस्तावाबद्दल पुतीन म्हणाले, प्रस्ताव चांगला आहे. आम्ही याचे समर्थन करतो. पण, काही मुद्दे आहेत, ज्यावर आम्हाला चर्चा करण्याची गरज आहे. या युद्धविरामामुळे शांतता प्रस्थापित झाली पाहिजे आणि या संकटाची मूळ कारणे दूर केली गेली पाहिजेत. आम्हाला आमच्या अमेरिकेच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करण्याची गरज आहे. होऊ शकते की, मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करेल. ३० दिवसांचा युद्ध विराम युक्रेनसाठी चांगला राहील.