एस टी बसचालकाची गळफास घेवून आत्महत्या ; शेरी बुद्रूक ता.आष्टी येथील घटना
----------------
सुट्टी संपल्यानंतर नोकरीवर पुन्हा रूजू होण्याच्या दिवशीच बसचालकाने शेतात गळफास घेवून जीवन संपविल्याची घटना शेरी बुद्रूक येथे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
दिपक विठ्ठल धाडगे वय ३३ असे आत्महत्या केलेल्या एस टी बसचालकाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रूक येथील दिपक विठ्ठल धाडगे हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आगारात चालक पदावर कार्यरत असून सोमवारी सुट्टी असल्याने तो गावी आला होता.
सुट्टीनंतर मंगळवारी पुन्हा कामावर जाण्याच्या आणि मंगळवारी कामाला निघायचे तर स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेवून जीवन संपविल्याची घटना घडली.
कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. आष्टी पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद असून पुढील तपास पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे करीत आहेत.