"सकाळ" माध्यमाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचे निधन,
उद्या पुण्यात अंत्यसंस्कार
पुणे :-भारती प्रतापराव पवार (वय ७७ वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. 'सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. १८) दुपारी १२ वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांच्यामागे मुलगा 'सकाळ'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच मुलगी अश्विनी, नातू झाकीर असा परिवार आहे.