साखरे सराई वाडीतील 32 कुटुंबातील लोकांनी मुरबाड तहसीलदार कार्यालय समोर सोमवारी बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
मुरबाड तालुक्यातील साखरे सराईवाडीत भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही रस्ता व पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने 32 कुटुंब सोमवारी बेमुदत उपोषण करणार आहेत.या वाडीत रस्ताच नसल्याने तीन लोकांना जीव गमावला असून एक जण मोटारसायकल वरून पडून अपंग झाला असून याबाबत अजून पर्यंत शासनानाला कोणतेही सोयरसुतक पडले नसल्याने सराई वाडीतील तरुण अशोक सराई किरण सराई विजय सराई दिपक सराई भगवान सराई वसंत सराई व 32 लोकांनी हा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे विशेष म्हणजे या रस्त्यावरुन कृषी विद्यापीठाची 400 विद्यार्थी जात असून यांना ही पावसाळ्यात अंगावरील कपडे काढून जावे लागत असल्याची माहिती किरण सर शाळेतील शिक्षक यांनी दिली आहे. आमच्या प्रतिनिधीना बोलताना सांगितले.