समता पॅनेलसाठी अनिल बोरनारे, एन एम भामरे यांचा झंझावाती दौरा
Raju Tapal
December 15, 2021
45
समता पॅनेलसाठी अनिल बोरनारे, एन एम भामरे यांचा झंझावाती दौरा
कल्याण शहरी व ग्रामीण शाळांमध्ये समता पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद
सेकंडरी स्कूल एम्प्लॉयीज क्रेडिट सोसायटीच्या निवडणूक प्रचारार्थ काल १३ डिसेंबर सोमवार व आज मंगळवार दिनांक १४ डिसेंबर २०२१ रोजी "समता पॅनल" चे प्रचारार्थ भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे, कोकण विभाग संयोजक एन एम भामरे, कल्याण जिल्हा अध्यक्ष सुभाष सरोदे यांनी कल्याण शहरी व ग्रामीण तसेच उल्हासनगर मधील २२ शाळांमध्ये समता पॅनेलच्या प्रचारासाठी झंझावाती दौरा करून समता पॅनेलची भूमिका मांडली यामध्ये महाराष्ट्र मित्र मंडळ हायस्कूल, माराळेश्वर विद्यालय, सम्राट अशोक विद्यालय, मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय, द्वारका विद्यामंदिर, विश्वास विद्यालय, पावशे विद्यामंदिर, स्वामी विवेकानंद संस्था, श्रीमती वेणूबाई अंबो पावशे विद्यालय, रॉयल प्राथमिक व माध्यमिक हायस्कूल, सिद्धार्थ विद्यालय, गजानन विद्यालय या शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांशी संवाद साधला. या प्रचारास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी "विजयी भव !" असा आशीर्वाद दिला.
Share This