संजय थोरात यांनी स्विकारला गट शिक्षणाधिकारी पदाचा पदभार
Raju Tapal
December 20, 2021
41
संजय थोरात यांनी स्विकारला मुरबाड पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार..!
मुरबाड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदावर संजय थोरात यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला.
मुरबाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला कायम स्वरूपी गटशिक्षणाधिकारी नसल्या मुळे शिक्षण विभागाचे कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. शिक्षण विस्तार अधिकारीच गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळत होते.त्या मुळे सेवा जेष्टते नुसार संजय थोरात यांनी वर्णी गटशिक्षणाधिकारी पदावर लागली असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मुरबाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार संजय थोरात यांनी स्वीकारला असून अनेक संस्था, शिक्षक संघटना यांनी त्यांच्या दालनात जाऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकालास शुभेच्छा दिल्या आहेत.
Share This