संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार शाश्वत ; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार शाश्वत असून समाजाला या विचारांची आजही आवश्यकता आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.
श्री.संत ज्ञानेश्रर महाराज संजीवन समाधी सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी आळंदी येथील श्री. ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
मंदिरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर कांबळे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विश्वास ढगे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, बाळासाहेब चोपदार, बाळासाहेब अरफळकर, योगी निरंजननाथ, उमेश बागडे, उपायुक्त प्रेरणा कट्टे, तहसीलदार वैशाली वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानैश्वर साबळे, स्वप्निल निरंजननाथ, उमेश बागडे यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुढे बोलताना म्हणाले, माऊलींनी चराचरातील लहान मोठ्यांना आईचे ममत्व दाखविले आहे. त्यामुळे त्यांनी केलेला उपदेश आजही समाजात प्रेरक आहे. समाजकल्याणासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा समाजकल्याणासाठी संपुर्ण विश्वात प्रसार व्हावा .
वीणामंडपात सुरू असलेल्या किर्तनात वीणा गळ्यात घेवून त्यांनी माऊलींचा गजर केला. देवस्थानच्या वतीने माऊलींची प्रतिमा देवून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा सत्कार करण्यात आला.