संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील 'माझा ज्ञानोबा' ही मालिका गुरुवारी ३० सप्टेंबरपासून मायबोली चॅनेलवर होणार प्रसारित..
Raju tapal
September 30, 2021
54
● प्रसिद्ध गायिका ज्योती गोराणे यांचे 'माझा ज्ञानोबा' मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण..
हनुमंत देवकर
श्री क्षेत्र आळंदी ( पुणे ) : आर्विक प्राॅडक्शनचे सर्वेसर्वा श्री. प्रशांतजी पवार निर्मित व श्री हभप. जलालजी महाराज लिखीत तसेच श्री प्रमोदजी श्रीवास्तव दिग्दर्शित कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारीत "माझा ज्ञानोबा" ही शुध्द सांप्रदायिक मालिका गुरुवार दिनांक ३० सप्टेंबर पासुन संधाकाळी ९ ते ९.३० या वेळेत प्रसारित होणार आहे.
● या मालिकेत महाराष्ट्रातील प्रसिध्द गायिका सौ. ज्योती शामजी गोराणे यांचे 'माझा ज्ञानोबा' मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण होत आहे. ज्योती गोराणे यांनी आजपर्यंत गायन क्षेत्रात वारकरी भजन, निवेदन अशा अनेक क्षेत्रामध्ये एक विशिष्ट उंची गाठली आहे.'स्वर ज्योतिर्मय शाम' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात स्वतःची एक स्वतंत्र शैली निर्माण करुन आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांचे पती महाराष्ट्रातील नामवंत तबलावादक आहेत. अनेक सेलिब्रिटी गायकांना व अनेक प्रकारच्या अल्बममध्ये त्यांनी संगीत तथा तबलासाथ केली आहे. मायबोली व फक्त मराठी चॅनल्सवरील आध्यात्मिक मालिकांना श्री. शामजी गोराणे यांचे संगीत आहे.
त्यांचा मुलगा सोहम गोराणे वय १३ हा जगप्रसिद्ध तबलावादक आहे. अनेक जगप्रसिद्ध गायकांसोबत सोहमने साथसंगत व जुगलबंदी केली आहे. अनेक चॅनल्सवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून सोहम घराघरात प्रसिध्द आहे.
'माझा ज्ञानोबा' या मालिकेला टायटल संगीत श्री. शामजी गोराणे यांनी केले आहे. तर पार्श्वसंगीत श्री. अरुणजी पगारे यांनी केले आहे. तसेच सौ. ज्योती गोराणे व श्री. रविजी पवार यांनी गायन केले आहे. तरी सर्वांनी मायबोली चॅनलवरील 'माझा ज्ञानोबा' ही शुध्द सांप्रदायिक मालिका अवश्य पहावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Share This