संविधानदिनानिमित्त शिरूर शहर व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
संविधानदिनानिमित्त शिरुर शहर व परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याच बरोबर शहरातील हुतात्मा स्मारकावर संविधान स्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात येवून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले .
हुतात्मा स्मारकावर संविधानदिना निमित्त झालेल्या कार्यक्रमास बहुजन मुक्ती मोर्चाचे फिरोजभाई सय्यद , लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक ,डॉ.मगन ससाणे , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर ,वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक विनोद भालेराव , नगरसेवक मंगेश खांडरे , मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यय ,नाथा पाचर्णे ,विजय भोईरकर , चाबुकस्वार ,बबन गायकवाड , माजी नगरसेवक सुकुमार बोरा , संतोष शितोळे ,बाबूराव पाचंगे आदी उपस्थित होते .
यावेळी बोलताना फिरोज सय्यद यानी संविधान दिना संदर्भातील माहिती दिली. तर रवींद्र धनक यांनी संविधानाची प्राणपणाने जपवणूक करावी असे आवाहन केले .
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठ अभ्यासकेंद्राचे केंद्र येथे ही संविधानदिनानिमित्त कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ के.सी. .मोहिते , केंद्र संयोजक प्रा. चंद्रकांत धापटे , प्रा.सतीश धुमाळ ,केंद्र सहाय्यक निळोबा भोगावडे ,आदी उपस्थित होते .
जीवन विद्या मंदिर शाळा या ठिकाणीही संविधानदिनानिमित्त कार्यक्रम झाला .
गोलेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत संविधान दिना निमित्त जनजागृती तसेच संविधाना विषयी प्रचार, प्रसार व्हावा या उद्देशाने शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधान निर्मिती पार्श्वभूमी व प्रक्रिया लघुपटाच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आली .घोषवाक्य रचना व सुलेखन,पोस्टर निर्मिती व फलकरेखन या उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते .