रोहिले बुद्रुक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील ग्रामपंचायतीने बौद्ध समाजासाठी 29 नोव्हेंबर 2012 रोजी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत येथील गावठाणा साठी शासनाने दिलेल्या सार्वजनिक सुविधेच्या जागे मधील भूखंड क्रमांक तीन हा बौद्ध विहारासाठी धार्मिक सामाजिक व इतर कार्यक्रम करण्यासाठी देण्यात यावा असा ठराव झालेला असताना देखील येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमाबाई नरवडे व ग्रामसेवक एन एस तडवी यांनी सदा ग्रामसभेचा ठराव धाब्यावर टांगून या बौद्ध विहाराच्या जागेवर व जागे समोरील जागा ग्रामपंचायतीच्या 11 नंबर रजिस्टर मध्ये नोंद करून घेतली. हे बेकायदेशीर असून हे अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देविदास पवार व ग्रामसेवक भगवान जाधव यांना सदर अतिक्रमण काढण्यासंदर्भात वेळोवेळी आज देखील दिले होते
तसेच सन 2016 मध्ये येथील बौद्ध ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग नाशिक, तहसील कार्यालय नांदगाव, गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांना सदरचे अतिक्रमण काढणे संदर्भात निवेदन दिले होते व उपोषण देखील केली होती तहसीलदार तहसील कार्यालय नांदगाव यांनी देखील 2016 मध्ये गटविकास अधिकारी यांना सदरची अतिक्रमण काढणे संदर्भात पत्र देखील देण्यात आली होते परंतु त्यांनीदेखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे येथील समाजासाठी नियोजित बौद्ध जागा मोकळी करून द्यावी व सदरचे अतिक्रमण काढण्यात यावा यासाठी आणि या ग्रामपंचायतीने केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक च्या आवारात केलेल्या तार कंपाउंड नुसार मोजून क्षेत्रफळानुसार 8अ चा उतारा करण्यात यावा या मागणीसाठी आज दिनांक 27 डिसेंबर 2021 पासून बेमुदत अमरण उपोषण सविधान आर्मीचे नाशिक जिल्हाध्यक्ष मुक्ताराम बागुल व रोजी येथील रवींद्र यादव बागुल तसेच येथील बौद्ध ग्रामस्थ यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.