सरळगाव हायस्कूल मधील मुख्याध्यापक नायकुडे सर व शिक्षकेत्तर कर्मयोगी मौर्य तात्या यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न
Raju tapal
September 30, 2021
36
सरळगाव विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सरळगाव ता. मुरबाड विद्यालयाचे प्राचार्य डी. टी. नायकुडे सर हे 33वर्षाच्या व वरिष्ठ सेवक आर. आर. मौर्य हे 40वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त झाले
विद्यालयातर्फे त्यांच्या पत्नीसह त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी रायते विभाग हायस्कूलचे माजी प्राचार्य एन. एम. भामरे सर व पदमश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय भिवंडी येथील वरिष्ठ शिक्षक बी. के. ह्याळीज सर सरळगाव विभाग हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक एस. डी पाटील सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातून नायकुडे सर व मौर्य तात्या यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या , शिक्षक मनोगतात प्रा. वाघचौरे यांनी आपले विचार मांडत दोघांना शुभेच्छा दिल्या,यावेळी नायकुडे सर यांनी सत्काराला उत्तर देताना संस्थेचे आभार मानून पदमश्री अण्णासाहेब जाधव साहेब यांचेविषयी ऋण व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सुरेख नियोजन विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. बी. पाटील सर यांनी केले होते. सूत्रसंचालन आर. एस. गोडांबे यांनी केले तर आभार एस एस बागुल सर यांनी मानले यावेळी सत्कारमूर्ती नायकुडे सर व मौर्य तात्या यांचे कुटूंबीय, नातेवाईक मित्र मंडळी, यांची उपस्थितीने कार्यक्रमांची शोभा वाढवली.
Share This