सरडेवाडी गावातील वाहन टोल फ्री करावी, गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी लोखंडी उड्डाणपुलाची तात्काळ निर्मिती करावी, टोलनाका परिसरात पुणे - सोलापूर लेन लगत सेवा रस्ता निर्माण करावा ,सेवा रस्ता संरक्षक भिंत उभारावी या व इतर मागण्यांसंदर्भात सरडेवाडी टोलनाक्यावर आज सोमवार दि.२० /०६/२०२२ रोजी टोल वसूली बंद आंदोलन करण्यात आले.
सरडेवाडीचे सरप़ंच सीताराम जानकर,कर्मयोगीचे संचालक रविंद्र सरडे, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, उपसरपंच सतिश चित्राव, माजी उपसरपंच हनुमंत जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य आप्पा माने, गोकूळ कोकरे बळीराम जानकर आदींसह ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलन अधिक चिघळू नये यासाठी इंदापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी मध्यस्थी केली.
टोल प्रशासनाकडून आठ दिवसांत मागण्यांसंदर्भात बैठक लावण्यात येईल, त्यातून मार्ग काढला जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.