गुजर प्रशालेत विज्ञान दिन उत्साहात साजरा
शिरूर :- तळेगाव ढमढेरे ( तालुका शिरूर ) येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
थोर शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांना भौतिकशास्त्रातले विज्ञान विषयातील भारतातले पहिले नोबेल पारितोषिक याच दिवशी प्राप्त झाले होते. या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन पूर्ण भारतात उत्साहात साजरा करण्यात येतो
विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाबद्दल जागृती निर्माण व्हावी व आजकालच्या टेक्निकल युगात विज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे हा या विज्ञान दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे असे मुख्याध्यापक अशोक दहिफळे यांनी सांगितले.
याप्रसंगी सी वी रमण यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे व प्रशालेतील विज्ञानाचे उपशिक्षक अरुण भगत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या विज्ञान विषय प्रमुख अर्चना गोरे यांनी केले.
यावेळी विज्ञान विषयाची माहिती विज्ञान विषयाबद्दल आजच्या युगात असलेले महत्त्व प्रशालेतील विद्यार्थिनी मानसी लवांडे, आर्या ढमढेरे ,सई ढमढेरे ,आनंदी टोणगे या विद्यार्थिनींनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना पटवून दिले.
प्रशालेचे उपशिक्षक गौतम जाधव यांनी विद्यार्थ्यांना आजच्या युगात वैज्ञानिक दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रशालेच्या उपशिक्षिका अंजली नरके यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंद ढमढेरे,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, यांनी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )