• Total Visitor ( 610985 )

जहाजबांधणीसाठी रायगड व पालघर मध्ये जागेचा शोध

Raju Tapal publisher May 09, 2026 35

जहाजबांधणीसाठी रायगड व पालघर मध्ये जागेचा शोध



मुंबई:- मुंबईच्या आजुबाजूला जलवाहतूक सुरू करायची असा विचार गेली अनेक वर्षे राज्य सरकारच्या राज्यकर्त्या मध्ये घोळत होता. मुंबई सात बेटांवर वसली आहे. त्यामुळे मुंबईला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा तर आहेच पण ह्या समुद्राच्या भरती ओहोटीचे पाणी पार वसई विरार कल्याण आणि इकडे उरण पर्यंत पसरलेले आहे. त्यामुळे इथे जलवाहतूक सुरू करणे शक्य आहे. फक्त काही ठिकाणी गाळ खडक यामुळे ते शक्य होत नाही. ब्रिटिश काळात ही जलवाहतूक सुरू होती. नव्हे त्यापूर्वी मराठा साम्राज्यात ही जलवाहतूक असल्याचे दाखले आहेत. तोच धागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पकडला आहे. नॉर्वे मधील एका कंपनी बरोबर करार करण्यात आला आहे. आता ह्या कंपनीला नंतर छोटी मोठी जहाजे लागणार आहेत. ती बांधणी साठी त्यांनी सरकार कडे जागा मागितली आहे. त्यासाठी ते अडीच हजार कोटी खर्च करायला तयार आहेत. आता जहाजबांधणी कारखाना आला म्हणजे रोजगार आला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement