जेष्ठ मराठी साहित्यिक, दूरदर्शनवरील प्रसिद्ध निवेदक प्रा.अनंत भावे यांचे निधन
शिरूर :- जेष्ठ मराठी साहित्यिक, दूरदर्शनवरील प्रसिद्ध निवेदक प्रा.अनंत भावे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी अल्पशा आजाराने रविवारी ( दि.२३ फेब्रुवारी ) पुण्यात निधन झाले.
बालसाहित्यामधील योगदानाबद्दल २०१३ मध्ये प्रा.भावे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
मुंबईमधील सोमय्या महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून अनंत भावे यांनी काम पाहिले होते.
मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.स्पष्ट शब्दोच्चार, आपल्या भाषा शैलीने दूरदर्शनवरील वृत्त निवेदक म्हणून त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटविला होता.
'अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी ', अशी सुट्टी सुरेख बाई, 'कासव चाले हळूहळू ' ,चल रे भोपळ्या टुणूक टुणूक,'चिमणे चिमणे' अशी त्यांची ५० हून अधिक बालवाड्.मय आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.साप्ताहिक 'माणूस'मध्ये स्तंभलेखन त्यांनी केले आहे. दैनिक महानगरमध्ये त्यांचे 'वडापाव' हे लोकप्रिय सदर होते.
प्रा.भावे यांच्या पत्नी मराठी समीक्षक, सामाजिक कार्यकर्त्या प्रा.पुष्पा भावे यांचे २०२० मध्ये मुंबईत निधन झाले. त्यानंतर ते पुण्यातील बाणेर मधील जयश्री अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )