शहापूर नगरपंचायत मध्ये सत्ता परिवर्तन होणार
भाजपा शिक्षक आघाडीचा शहापूरमध्ये झंझावाती दौरा
शहापूर (प्रतिनिधी) शहापूर नगरपंचायत निवडणूकित सत्ता परिवर्तन होणार असून या सत्तापरिवर्तनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा शिक्षक आघाडीने केला आहे
"प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास" हे ब्रीदवाक्य घेऊन शहापुरच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी निवडणुकीत उतरली असून काल १८ व आज १९ डिसेंबर रोजी भाजपा शिक्षक आघाडीने प्रचाराची आघाडी घेतली आहे. भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, कोकण विभाग संयोजक एन एम भामरे सर, वैद्यकीय आघाडी संयोजक प्रकाश पाटील, भिवंडी संयोजक जी ओ माळी सर यांनी भाजपा प्रचारार्थ आज शहापुरातील अनेक शैक्षणिक संस्था प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर तसेच खान्देशातील प्रतिष्ठितांच्या भेटी घेतल्या. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ग्रामीण विकासाच्या संकल्पनेवर आधारित विकासाची गंगा शहापूर येथे आणण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन अनिल बोरनारे यांनी केले.