शाळेची घंटा पुन्हा वाजणार 24 जानेवारी पासून पुन्हा शाळा सुरू शिक्षणमंत्र्यांची माहिती
राज्यातील सर्व शाळा येत्या सोमवार पासून सुरू होणार असून शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे. या प्रस्तावानुसार पहिली ते बारावी नियमित वर्ग सुरू होणार. प्रीप्रायमरीचे वर्ग देखील कोरोना नियम पाळून भरण्यास शिक्षण विभागाची परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
शिक्षण क्षेत्रात काम करणाऱया विविध संघटना, संस्था, विद्यार्थी तसेच पालकवर्गाकडूनही कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्तांना स्थानिक स्तरावर आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचे सर्वाधिकार देण्यात यावेत, असा प्रस्ताव सादर केला आहे.